ऑनलाईन एक लीटर दुध पडले 18 लाखाला ; काय आहे नेमकी भानगड
One liter of milk sold online for 18 lakhs मुंबई (16 ऑगस्ट 2025) : ऑनलाईन एक लीटर दुध ऑर्डर करताना महिलेने अनोळखी लिंकला क्लीक करताच महिलेच्या खात्यातून तब्बल साडेअठरा लाख वळते करण्यात आल्याचा प्रकार मुंबईत घडला. सातत्याने होणार्या फसवणुकीच्या घटना पाहता नागरिकांनी व्यवहार सतर्कतेने करावेत, असे आवाहन सायबर सेलने केले आहे.
काय घडले मुंबईत ?
वडाळा येथील महिलेने ऑनलाइन डिलिव्हरी अॅपवरून दूध ऑर्डर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन दिवसांत तिची संपूर्ण बचत गायब झाली.महिलेला हे कळताच तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.





पोलिसांनी सांगितले की, ही घटना 4 ऑगस्ट रोजी घडली. महिलेला एका व्यक्तीचा फोन आला ज्याने स्वतःची ओळख दीपक म्हणून करून दिलीफ जो एका दूध कंपनीचा अधिकारी आहे. फसवणूक करणार्या व्यक्तीने महिलेच्या मोबाईल नंबरवर एक लिंक पाठवली आणि दूध ऑर्डर करण्यासाठी माहिती मागितली.
फसवणूक करणार्याने महिलेला लिंकवर क्लिक करण्यास आणि कॉल डिस्कनेक्ट न करता सूचनांचे पालन करण्यास सांगितले. कॉल एका तासापेक्षा जास्त काळ चालू राहिल्याने महिलेला कंटाळा आला आणि तिने कॉल डिस्कनेक्ट केला. पण दुसर्या दिवशी महिलेला पुन्हा फसवणूक करणार्याचा फोन आला.
जेव्हा ती महिला बँकेत गेली तेव्हा तिला आढळले की तिच्या एका खात्यातून 1.7 लाख रुपये काढले गेले आहेत. अधिक तपास केल्यावर असे आढळून आले की तिची आणखी दोन बँक खाती देखील रिकामी झाली आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार महिलेला तिन्ही बँक खाती रिकामी झाल्यामुळे 18.5 लाख रुपयांचे नुकसान झाले. आरोपीने महिलेच्या मोबाईलवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तिचा फोन हॅक केला होता.
