गाण म्हणणार्या तहसीलदारांचे निलंबन : काय घडले नेमके
Suspension of Tehsildars for singing : What exactly happened? नांदेड (17 ऑगस्ट 2025) : खुर्चीवर बसून अंगविक्षेप करत गाणं गायल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके
8 ऑगस्ट रोजी थोरात यांच्या बदलीच्या निमित्ताने आयोजित निरोपाच्या कार्यक्रमातील त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची दखल महसूल विभागाने घेतली.





ांदेडच्या जिल्हाधिकार्यांच्या शिफारशीनंतर तहसीलदार थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात थोरातांना धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात थांबण्याची सूचना देण्यात आली आहे.
थोरातांनी निलंबन काळात खासगी नोकरी किंवा व्यवसाय करू नये, असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत. शासकीय पदावर असताना अशा प्रकारच्या कृतीमुळे प्रशासकीय नियमांचे उल्लंघण झाल्याचे मानले जात आहे. या घटनेमुळे शासकीय अधिकार्यांच्या वर्तनावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ही कारवाई प्रशासकीय शिस्त आणि नियमांचे पालन करण्याच्या गरजेवर भर देते.
