नागरि समस्या सुटण्यासाठी आंदोलन करणार्या आंदोलकाचा अखेर सापडला मृतदेह
The body of a protester who was protesting to resolve a civil problem was finally found. बुलढाणा (17 ऑगस्ट 2025) : स्वातंत्र्यदिनी नागरि समस्या सुटण्यासाठी जलसमाधी आंदोलन करणारा आंदोलक विनोद पवार हा पूर्णा नदीच्या पाण्यात वाहिला होता. दोन दिवसांनंतर प्रशासनाला या आंदोलकांचा मृतदेह सापडला आहे.
15 किलोमीटर अंतरावर सापडला मृतदेह
15 ऑगस्ट रोजी जिगाव प्रकल्पाविरोधात काही गावकर्यांनी आंदोलन केले होते. त्यापैकी विनोद पवार या आंदोलकाने जलसमाधी घेतली होती. पूर्णा नदी पात्रात त्यांनी उडी घेतली. त्यानंतर जिल्हा पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, आरोग्य पथक आणि छऊठऋ टीमकडून त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र शनिवारी दिवसभर काहीच पत्ता लागला नाही. रात्री अंधार झाल्यानंतर सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून पूर्ण यंत्रणा पुन्हा शोध मोहिमेला लागली. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास धुपेश्वरजवळ विनोद पवार यांचा मृतदेह सापडला. मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमोर्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे असं त्यांनी सांगितले.





काय आहे प्रकरण?
जिगाव प्रकल्पातील आडोळ खुर्द हे पहिल्या टप्प्यातील गाव आहे. परंतु प्रशासनाने या गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. 2016 साली आडोळ खुर्द गावाला अतिशय कमी स्वरूपात घरांचा मोबदला देण्यात आला. त्यानंतर एक ते दोन वर्षात नवीन गावठाणात प्लॉट देणे आवश्यक होते. परंतु संबंधित खात्याच्या हलगर्जीपणामुळे 2023 मध्ये येथील नागरिकांना प्लॉट वाटप झाली. एकाच प्रकल्पातील इतर गावांना वेगळा न्याय व आडोळ खुर्द गावाला वेगळा न्याय कशासाठी हा प्रश्न गावकरी विचारात होते. वारंवार प्रशासनाकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने गावकर्यांनी अखेर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मुलं बाळांसकट हे गावकर्यांनी जिगाव प्रकल्पाच्या पूर्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी विनोद पवार यांनी पूर्णा नदीत उडी मारली.
