जळगावातील स्पेक्ट्रम इंण्डस्ट्रीजमध्ये चोरी : तीन कामगारांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या


Theft at Spectrum Industries in Jalgaon : Crime Branch arrests three workers जळगाव (18 ऑगस्ट 2025) : जळगाव एमआयडीसीतील जी-सेक्टरमध्ये असलेल्या स्पेक्ट्रम कंपनीतून 40 हजार रुपये किंमतीच्या 40 किलो कॉपरच्या पट्ट्या चोरी केल्याप्रकरणी कंपनीतीलच तीन कामगारांना जळगाव गुन्हे शाखेने अटक करीत मुद्देमाल जप्त केला आहे.

काय घडले जळगावात
जी-सेक्टरमध्ये असलेल्या स्पेक्ट्रम कंपनीचे व्यवस्थापक बाळू गोवर्धन पाटील (खेडी रोड, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 15 रोजी रात्रीच्या वेळी कंपनीतून 40 हजार रुपये किंमतीच्या कॉपर पट्ट्या लांबवण्यात आल्या. या प्रकरणी रविवार, 17 ऑगस्ट रोजी मध्यरात्री एका वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होताच समांतर तपासात गुन्हे शाखेने आरोपी निष्पन केले.






या आरोपींना अटक
ओम रामेश्वर पोपटकर (20, वाघनगर, जळगाव), रोहित उर्फ रोहन भिकन मराठे (22, कासमवाडी, जळगाव) व सागर धर्मेंद्र सपकाळे (19, वाघ नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, एएसआय अतुल वंजारी, हवालदार विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, राहुल रगडे, उदय कापडणे, मुरलीधर धनगर, सिद्धेश्वर डापकर आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !