जळगावातील सफाईचा मक्ता ‘बीव्हीजी’ लाच ; वॉटरग्रेसचा दावा फेटाळला
खंडपीठाचा निकाल : 1 सप्टेंबरपासून करणार ‘बीव्हीजी’ करणार स्वच्छतेचे काम
Jalgaon cleaning authority ‘BVG’ bribed ; WaterGrace’s claim rejected जळगाव (19 ऑगस्ट 2025) : शहरातील कचरा संकलनाचा मक्ता बीव्हीजी इंडिया प्रा.लि. यांच्याकडेच राहणार असून 1 सप्टेंबरपासून संबंधित संस्था आता शहरात कामास सुरूवात करणार आहे तरवॉटरग्रेसने दाखल केलेला दावा औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी फेटाळत बीव्हीजीच्या बाजूने निकाल दिला आहे.
महापालिकेचा पैसा हा तर जनतेचा
वॉटरग्रेस यांनी आपल्यालाच सफाईचा मक्ता मिळावा यासाठी याचिका दाखल केल्याने या याचिकेवर 11 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. सोमवारी कोर्टाने बीव्हीजीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर बीव्हीजी आता 1 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली.





या प्रकरणात सुनावणीच्यावेळी महापालिकेच्या वकिलांनी जर वॉटरग्रेस कंपनीला कचरा संकलनाचा मक्ता दिला तर महापालिकेवर तब्बल 37 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडू शकतो. याउलट, बीव्हीजी कंपनीला मक्ता दिल्यास 33 कोटी रुपयांची बचत होऊ शकते. महापालिकेचा पैसा हा जनतेचा पैसा असल्यामुळे ज्या मक्तेदारामुळे महापालिकेचा फायदा होईल, त्यालाच मक्ता देणे योग्य आहे, असा युक्तिवाद केला होता.
वॉटर ग्रेसनेही केला होता दावा
वॉटरग्रेसच्या वकिलांनी महापालिकेने निविदेनंतर नियमांमध्ये बदल केले व हे बदल एखाद्या विशिष्ट कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी केले असल्याचा दावा केला.
दरम्यान, न्यायालयाच्या अधीन राहून महापालिकेने बीव्हीजीला यापूर्वीच कार्यादेश दिले होते. न्या.मनीष पितळे आणि न्या.वाय.जी.खोब्रागडे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. महापालिकेकडून अॅड.राजेंद्र देशमुख व अॅड.निर्मल दायमा (भुसावळ) तर वॉटरग्रेसकडून अॅड.अभिनव चंद्रचूड आणि बीव्हीजीकडून अॅड.करण भोसले यांनी प्रभावी युक्तीवाद केला.
