पाचोर्यात राजकीय समीकरणे बदलणार ! : ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत वैशाली सूर्यवंशी भाजपात
Vaishali Suryavanshi joins BJP, hailing Thackeray group for ‘Jai Maharashtra’ पाचोरा (20 ऑगस्ट 2025) : शिवसेनेतील ठाकरे गटाच्या पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी मंगळवारी मुंबईत भाजपत प्रवेश केल्याने आगामी काळात मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे
यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश पार पाडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले. दरम्यान, सूर्यवंशी यांच्या प्रवेशामुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहे. आमदार किशोर पाटील यांचे सर्व विरोधक त्यांच्या मित्र पक्षात एकवटल्याने त्याचे प्रतिबिंब जिल्हा परिषद निवडणुकीत दिसणार आहे.





किशोर पाटील यांचे सर्व विरोधक भाजपात
गत विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी यांनी निवडणूक लढवली होती तसेच माजी आमदार दिलीप वाघ आणि अमोल शिंदे स्वतंत्र उमेदवार होते. अमोल शिंदे भाजपमध्ये असून अलीकडेच दिलीप वाघ हे देखील भाजपमध्ये दाखल झाले आहे. त्यांच्या पाठोपाठ वैशाली सूर्यवंशींनी भाजपची वाट धरली. त्यामुळे पाचोर्यातील आमदार किशोर पाटील यांचे सर्व विरोधक त्यांच्या मित्रपक्षांत एकवटले आहे त्यामुळे पाचोर्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे. येत्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब बघायला मिळेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
