अमळनेरचा शेतकरी पुरात वाहिला : तीन दिवसानंतर मृतदेहच सापडल


Amalner farmer swept away in flood : Body found three days later अमळनेर (20 ऑग्स्ट 2025) : अमळनेर तालुक्यातील पातोंडा-नांद्रीला जोडणार्‍या लवण नाल्याला आलेल्या पुरात पाय घसरून वाहून गेलेले शेतकरी सर्जेराव संतोष बिरारी (55) यांचा मृतदेह तीन दिवसानंतर सापडल्याने कुटूंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय घडले शेतकर्‍यासोबत
रविवार, 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सर्जेराव बिरारी हे लवण नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी नितीन मुंडावरे आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पथकाने तात्काळ शोधकार्य सुरू केले. तसेच, ग्रामस्थांनीही पोहणार्‍या व्यक्तींच्या मदतीने बिरारी यांचा शोध घेतला, मात्र दोन दिवसांपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.






मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना सर्जेराव बिरारी यांचा मृतदेह तरंगताना दिसला. ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी जी.एम. पाटील यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. त्यानंतर, सायंकाळी 7 वाजता शोकाकुल वातावरणात सर्जेराव बिरारी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्जेराव बिरारी हे कुटुंबातील एकटे कर्ते पुरुष होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबाचा आधार हरपला असून, त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !