अत्याचारातून अल्पवयीन गर्भवती : अमळनेर तालुक्यातील तरुणाला अटक
Minor gets pregnant due to rape : Youth from Amalner taluka arrested अमळनेर (21 ऑगस्ट 2025) : अमळनेर तालुक्यातील एका गावातील सुमारे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्यानंतर तिच्याशी सातत्याने शारीरीक संबंध ठेवण्यात आल्याने पीडीता गर्भवती राहिली. हा प्रकार कुटूंबियांच्या लक्षात आल्यानंतर आरोपीविरोधात अमळनेर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली.
कुटूंबियांना संबंध सांगण्याची धमकी देत अत्याचार
सुमारे 15 वर्षीय अल्पवयीन पीडीता बहिणीच्या सासरी एका गावात आल्यानंतर आरोपी अजय सुकलाल मोरे (21) याच्याशी तिची ओळख झाली व त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्मा झाले. पीडितेचे आई-वडील व भाऊ कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर आरोपीने पीडीतेच्या एका गावातील घरी येत संबंध ठेवले. पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपीने संबंध जाहीर करण्याची धमकी दिली मात्र पीडीतेच्या बहिणीच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तिने विचारपूस केल्यानंतर खरा प्रकार समोर आला.





