भुसावळातील संविधान नगरातील रहिवाशांचे रेशनकार्डासाठी तहसीलदारांना ‘साकडे’
Tehsildars ‘sent to’ for ration cards for residents of Samvidhan Nagar in Bhusawal भुसावळ (21 ऑगस्ट 2025) : शहरातील संविधान नगरातील रहिवाशांनी रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी तहसीलदार निता लबडे यांच्याकडे केली आहे. या भागात गेल्या सात-आठ वर्षांपासून अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत मात्र अद्यापपर्यंत त्यांना रहिवास पुरावा म्हणून रेशनकार्ड मिळालेले नाही.
अलीकडेच 18 ऑगस्ट रोजी महसूल मंत्री संजय सावकारे व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संविधान नगरातीलघरे 45 दिवसांच्या आत रहिवाशांच्या नावावर करून देण्यास मान्यता देण्यात आली त्यामुळे या रहिवाशांना रेशनकार्डाची नितांत गरज असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.





