यावल शहरात महामार्गावर वाहन अडवून जबरी लूट : भुसावळसह यावलच्या आरोपींना बेड्या
Robbery by stopping a vehicle on the highway in Yaval city : Accused from Bhusawal and Yaval arrested यावल (21 ऑगस्ट 2025) : शहरातून मार्गस्थ होणार्या अंकलेश्वर – बर्हाणपूर महामार्गावर मध्यरात्री एका 24 वर्षीय पिकअप मालवाहू वाहन चालकाला दोघांनी दारूच्या नशेत अडवत त्याच्याजवळील रोख रक्कम हिसकावली होती व मारहाण करीत पळ काढला होता. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल होताच या गुन्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
काय घडले यावल शहरात
शहरातून मार्गस्थ होणार्या अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर बुरूज चौकाच्या अलीकडे फैजपूरकडून चोपड्याकडे पिकअप चारचाकी वाहन घेऊन रोहित प्रकाश रल (24, रा.चोपडा) हा तरुण जात असताना मध्यरात्री त्याचे वाहन दोन अनोळखी तरुणांनी दारूच्या नशेत अडवले. व या वाहन चालकाच्या डेसबोर्डच्या डिक्कीतून पाच हजारांची रोकड चोरी केली व त्याला मारहाण करीत पळ काढला. ही घटना 18 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी अनोळखी चोरट्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





गोपनीय माहितीवरून कारवाई
फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे, हवलदार वासुदेव मराठे, निलेश चौधरी, अमीत तडवी, अर्षद गवळी, एजाज गवळी, अनिल साळुंखे, सागर कोळी यांच्या पथकाने बुरूज चौकासह परिसरातून माहिती काढत आरोपी समशेर शाह सलीम शहा (27, रा.बाहेरपुरा, यावल मूळ रहिवासी पंचशील नगर, भुसावळ) याने समीर रहेमान तडवी (22, रा.तडवी कॉलनी, यावल) याच्यासोबत केल्याचे उघड झाले.
तडवी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर समशेर शहा मात्र हा शहरातून पसार असल्याने शोध सुरू असताना तेा जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात एका घरात तो लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला तेथून ताब्यात घेण्यात आले
दोघांना यावल येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींकडून पोलिसांनी या गुन्ह्यात हिसकावलेल्या रकमेपैकी काही रक्कम जप्त केली. तपास सहायक फौजदार विजय पासपोळे करीत आहे.
