जळगावात सोन्या-चांदीच्या दरात उच्चांक : जाणून घ्या नेमके भाव

जळगाव (24 ऑगस्ट 2025) : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तिसर्या दिवशी सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झाली. शनिवारी सोने दरात एक हजारांची तर चांदी दरात तब्बल तीन हजार 90 रुपयांची वाढ झाल्याने चांदी दराने नवीन विक्रमी उच्चांक गाठल. ऐन सणासुदीच्या दिवसात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
भावाचा आलेख वाढताच !
शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार सुरू असल्याचे दिसून येते. या आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसात सोने दरात घसरण झाली. त्यात 800 रुपयांहून अधिकची घसरण झाल्याने सोन्याचा दर विना जीएसटी एक लाखाखाली आल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता मात्र मागच्या तीन दिवसात पुन्हा मोठी वाढ झाली. यामध्ये सोन्याच्या भावात 21 ऑगस्ट रोजी 300 रुपये, 22 रोजी 100 आणि 23 रोजी 1000 रुपयाची वाढ झाली. यामुळे सोन्याचा दर पुन्हा लाखाच्या वर गेला आहे.
आता काय आहे सोन्याचा दर?
जळगाव सराफ बाजारात आज सकाळच्या 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 100600 (जीएसटीसह 103618) रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले आहे. तर 22 कॅरेट सोने 92,220 (जीएसटी 94,986) रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले आहे.
चांदीचा दर?
चांदी दरातही गेल्या तीन दिवसात मोठी वाढ झाली. चांदीच्या भावात 21 ऑगस्ट रोजी 2 हजार, 22 रोजी 1 हजार आणि 23 रोजी तब्बल 3090 रूपयांची वाढ झाली. यामुळे आज सकाळच्या सत्रात चांदीचा एक किलोचा दर 118000 रुपयावर पोहोचले. तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 1 लाख 21 हजार 540 रुपये मोजावे लागणार आहे. चांदीचा हा दर आजपर्यंत उच्चांकी दर ठरला आहे. जळगावात चांदीने गाठलेला उच्चांकी टप्पा लक्षात घेता ग्राहकांना मोठा धक्का बसला.