शहाद्यातील कोरोनाबाधीत युवकाचा मृत्यू


नंदुरबार जिल्ह्यात उडाली खळबळ : आरोग्य यंत्रणा अलर्ट

शहादा : शहरातील एका भागातील कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या 32 वर्षीय युवकाचा बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास उपचार घेत असताना मृत्यू झाल्याने शहाद्यासह नंदुरबार जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे पहिलाच बळी गेला असून या घटनेनंतर आरोग्य विभागाने प्रचंड खबरदारी घेत उपाययोजनांना सुरुवात केली आहे. दरम्यान, 32 वर्षीय इसमास 19 रोजी त्रास होत असल्याने त्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचे स्वॅब घेण्यात आले होते व त्याचा अहवाल 22 रोजी पॉझिटीव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणा प्रचंड अलर्ट झाली होती.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी
रुग्ण राहत असलेला परीसर 22 रोजी रात्रीच सील करण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाकडून उपाययोजनांवर भर देण्यात आला होता तसेच बुधवारी रात्री 11 वाजेच्या नंतर या रुग्णाचा मृत्यू ओढवल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.






मध्यरात्रीच अंत्यसंस्कार
शहाद्यातील कोरोनाबाधीत इसमावर मध्यरात्रीच नंदुरबार येथे अंत्यसंस्कार (दफनविधी) करण्यात आला. याप्रसंगी पोलिस निरीक्षक, मुख्याधिकारी तसेच शासनाने नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !