भुसावळातील कुख्यात बाबा काल्या जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

असे आहे लूट प्रकरण
भुसावळातील मुस्लीम कॉलनी भागातील 21 वर्षीय महिलेशी असभ्य वर्तन करीत आरोपी शोलू, बाबा काल्या व सादीक इबादत अली यांनी चार ते पाच हजार रुपये लूटले होते. ही घटना 7 जून 2025 रात्री सव्वा वाजता घडली होती. भुसावळ बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल होता.
कुख्यात बाबा काल्याविरोधात आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल असून तो या गुन्ह्यात पसार झाल्यानंतर फैजपूरातील हॉटेल हॉटस्पॉट येथे आल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर पथकाने आरोपीच्या सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या व त्यास बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेडेड पोलिस उपनिरीक्षक रवी नरवाडे, हवालदार गोपाळ गव्हाळे, हवालदार उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, तसेच फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या नेतृत्वातील उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद, कॉन्स्टेबल जुबेर शेख आदींच्या पथकाने केली.