यावल शहरात भांडे वाटपात पुन्हा गोंधळ ; लाभार्थी प्रचंड संतप्त


Confusion again in distribution of utensils in Yaval city; Beneficiaries extremely angry यावल (28 ऑगस्ट 2025) : यावल बाजार समितीच्या गोदामात गुरुवारी पुन्हा अनेक गवंडी तथा बांधकाम कामगारांना भांडे घेण्यासाठी बोलवण्यात आले होते. सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येत महिला व नागरिकांची गर्दी होती. मात्र दुपारचे एक वाजण्यात आले तरीदेखील येथे वितरण करण्यासाठी कोणीच आले नाही म्हणून संतप्त झालेल्या महिलांनी व नागरिकांनी पुन्हा अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्ग अडवण्यासाठी भुसावळ टी पॉइंट गाठले.

पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत वारंवार आपण प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरुद्ध आंदोलन करू नये रीतसर निवेदन द्यावे, असे त्यांची समजूत काढली. दरम्यान नागरिकांनी तहसील कार्यालय व पंचायत समिती या ठिकाणी देखील निवेदन दिले.
















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !