जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : सोलर पंप चोरट्यांना बेड्या

Jalgaon Crime Branch’s performance: Solar pump thieves arrested जळगाव (29 ऑगस्ट 2025) : ट्रकमधून सबमर्सीबल आणि सोलर पंप चोरी करणा-या चोरट्यांना एलसीबी पथकाने अटक केली व आरोपींना अधिक तपासार्थ रंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
आकाश लालचंद मोरे, भरत बाबुराव बागुल, पृथ्वीराज रतीलाल पाटील अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
या चोरीप्रकरणी 31 मे 2025 रोजी एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. एरंडोल तालुक्यातील उमरदे या गावाजवळ रस्त्यावर घडलेल्या या चोरीच्या घटनेत दोन लाख 35 हजार रुपये किंमतीचे सबमर्सीबल आणि सोलर पंप चोरट्यांनी ट्रकमधून चोरुन नेले. या गुन्ह्याचा समांतर तपास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते.
गुप्त बातमीदारासह तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून हा गुन्हा आकाश लालचंद मोरे (रा.मुगपाठ, पद्मालय) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती निष्पन्न झाली. त्या माहितीच्या आधारे आकाश यास नागदुली गावाजवळ असलेल्या पद्मालय परिसरातून ताब्यात घेण्यात आले. हा गुन्हा त्याने भरत बाबुराव बागुल, पृथ्वीराज रतीलाल पाटील, पंकज रवि बागुल यांच्या साथीने केला असल्याचे त्याने कबुल केले. त्या माहितीच्या आधारे तपासाअंती आकाश लालचंद मोरे, भरत बाबुराव बागुल, पृथ्वीराज पाटील असे तिघे पोलिस पथकाच्या हाती लागले. त्यांना एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीपप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे, हवालदार संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रवीण मांडोळे, राहुल कोळी, दीपक चौधरी आदींनी आरोपींच्या मुसक्या बांधल्या.