धुमस्टाईल वृद्धेच्या गळ्यातील मंगलपोत लांबविली

Dhumstyle extended the auspicious knot around the old woman’s neck जळगाव (29 ऑगस्ट 2025) : जळगावच्या टिळक नगरात वृद्धा मंदिरातून घरी जात असताना भामट्यांनी धूम स्टाईल पोत लांबवली. ही घटना मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत बुधवार, 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शारदा अर्जूनराव जाधव (76, रा.मयुरेश्वर कॉलनी, जळगाव) या वृध्द महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. मंगळवारी 2सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वृध्द महिला ह्या त्यांच्या मैत्रीणीसोबत मंदीरातून घरी परत जात असतांना टिळक नगरातील रस्त्यावर अज्ञात दोन चोरटे हे दुचाकीवर आले.
एकाने त्यांच्या गळ्यातील 70 हजार रूपये किंमतीची अडीच तोळ्याची सोन्याची पोत जबरी हिसकावून धुमस्टाईल चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली तोपर्यंत चोरटे हे दुचाकीवरून पसार झाले. याबाबत त्यांनी बुधवारी 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत.