मनियार बिरादरीच्या 27 व्या सभेत 15 ठरावांना मंजुरी
15 resolutions approved in the 27th meeting of Maniyar Biradari जळगाव (1 सप्टेंबर 2025) : जळगाव जिल्हा मनियार बिरादरीची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, 31 ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर येथील अक्सा हॉलमध्ये अध्यक्ष फारुक शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला बिरादरीचे सदस्य, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन संस्थेचे सचिव अजीज सर यांनी केले.
सभेत मागील कार्यवाहीची पुष्टी, वार्षिक अहवाल व हिशोब पत्रकास मंजुरी, 2025/26 या वर्षातील कार्यक्रमांवर चर्चा तसेच समाजहिताचे विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक एम योजनांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. या साठी जळगाव शहरात सर्व सोई युक्त हॉल बांधकामास मंजुरी देण्यात आली.





या विशेष ठरावांना मंजुरी
जिल्ह्यात मुस्लिम समाजावर अन्याय व खोटे गुन्हे दाखल होण्याच्या घटनांबाबत सभेत गंभीर चर्चा होऊन खालील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
मुस्लिम समाज कायद्याच्या चौकटीत राहून शांतता, बंधुता व सौहार्द टिकविण्यास कटिबद्ध आहे.
प्रशासन व पोलीस यांनी जिल्ह्यातील कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची खात्री द्यावी.
अफवा, द्वेषपूर्ण भाषण व सोशल मीडियावरील भडकावू संदेश यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.
मुस्लिम नागरिकांवर जर खोटे गुन्हे दाखल झाले, तर निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा.
हा ठराव जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच राज्य अल्पसंख्यांक आयोग, मानवाधिकार आयोग यांना सादर करण्यात येणार आहे.
बिरादारीच्या या वार्षिक सभेत समाजाने ऐक्य, बंधुता व शांतता टिकविण्याचा निर्धार केला तसेच प्रशासनाने जिल्ह्यात समान न्याय सुनिश्चित करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सभेत यांनी घेतला सहभाग
शब्बीर (अडावद), हकीम चौधरी (मुक्ताईनगर), असलम सर (साकली), रफिक खान (चाळीसगाव), हाफिज शेख (यावल), मुनाफ शेख (जामनेर), कलीम खान (फैजपूर), दगडू वजीर (भडगाव), साबीर शेख (भुसावळत्र, इकबाल तकी (धरणगावत्र, रफिक नादर (बोदवडत्र, इब्राहिम हाजी (शिरसोली), गफूर शेख (एरंडोल), आरिफ शेख आणि हमीद हवालदार (चोपडा), सादीक टेलर (न्हावी), जळगाव शहरातून कासीम उमर, ताहेर शेख, रऊफ शेख, सलीम रेडिएटर, अख्तर भांजा, फारुक ठेकेदार, आसीफ ठेकेदार आदींची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन सचिव अजीज शेख तर प्रास्ताविक मुक्ताईनगरचे हातीम चौधरी, अहवाल वाचन चाळीसगावचे रफिक खान, आभार मोहम्मद इकबाल (धरणगाव) तर सभेचे समारोप आसिफ सर यांच्या दुआ ने झाली. यशस्वीतेसाठी मुक्ताईनगरचे हकीम चौधरी, अहमद ठेकेदार, कलीम मणियार, मुशीर मणियार, अकील मणियार,तर जळगाव चे रऊफ टेलर, अल्ताफ शेख, अख्तर शेख, रईस टिल्या व कासिम उमर आदींनी परिश्रम घेतले.
