भुसावळात स्व.दादासाहेब एन.के.नारखेडे यांना पुण्यस्मरणदिनानिमित्त अभिवादन
Tributes paid to the late Dadasaheb N.K. Narkhede on his death anniversary in Bhusawal भुसावळ भुसावळ (1 सप्टेंबर 2025) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये स्व.दादासाहेब एन.के. नारखेडे यांना सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सोमवार, 1 सप्टेंबर रोजी अभिवाद करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, अॅड.सुशील अत्रे (जळगाव), संस्थेचे ऑनररी जॉईंट सेंकेटरी प्रमोद नेमाडे, संस्थेचे सभासद विकास पाचपांडे, संस्थेचे सभासद भाग्येश नारखेडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या.





कार्यक्रमांची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते आदरणीय कै.मा.श्री दादासाहेब एन. के. नारखेडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. याप्रसंगी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय रुपाली चौधरी यांनी दिला.
विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती वाढवावी
अॅड.सुशील अत्रे म्हणाले की, विद्यार्थ्यांना खेळू द्या, विद्यार्थ्यांची सामाजिक, मानसिक प्रतिकारशक्ती वाढवावी. त्यांच्यात नकार पचवण्याची क्षमता वाढवली पाहिजे. आपल्या मुलांना स्वतःचे कुटुंबाचे चांगले घटक बनवले पाहिजे. शारीरिक उर्जा व बौध्दिक उर्जा प्रत्येकातच असते. पण त्यांना दिशा योग्य मिळाली नाही तर ते भरकटत जातात.
संस्थेचे सेंक्रेटरी पी.व्ही.पाटील यांनी दादासाहेबांसोबतचे अनुभव सांगितले तसेच राहुल भारंबे यांनी दादासाहेबांच्या जिवनावर आधारित काही प्रसंगांचे संगणकावर सादरीकरण केले.
भाग्येश नारखेडे यांनी दादासाहेबांच्या स्मृतींना आपल्या भाषणातून उजाळा दिला. दादाच्या स्मृती कायम स्मरणात राहतील असे सांगितले. दादांना स्वच्छतेची आवड होती. म्हणून आजच्या दिवसाचे औचित्य साधून दादाच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वात स्वच्छ असलेल्या वर्गाला भाग्येश नारखेडे यांच्याकडून ट्राफी देण्यात आली.
माजी मुख्याध्यापक व संस्थेच्या सर्व शाखेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन गजाला बासित यांनी केले. आभार प्रदर्शन रुही बासीत यांनी मानले.
