हातोडीचे घाव घालत अमळनेरात नराधम मुलाने पित्याची केली हत्या


Son kills father in Amalner inflicts injuries with hammer अमळनेर (1 सप्टेंबर 2025) :  जन्मदात्याची मुलाने निर्घृृण हत्या केल्याच्या घटनेने अमळनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरातील 36 खोली भागात ही घटना रविवार, 31 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता घडली. राजेंद्र दत्तात्रय रासने (64) असे खून झालेल्या पित्याचे तर भूषण राजेंद्र रासने (36) असे अटकेतील आरोपी मुलाचे नाव आहे.

किरकोळ वाद बेतला जीवावर
किरकोळ वादातून संतप्त झालेल्या मुलाने लोखंडी हातोडीने वडिलांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना ठार केले. रविवार. 31 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. राजेंद्र दत्तात्रय रासने (वय 64) हे त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे कळताच त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.






खुनासाठी वापरलेली हातोडी जप्त
पोलिस व फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी खुनासाठी वापरलेली लोखंडी हातोडी जप्त केली तर फॉरेन्सिक तज्ज्ञांनी पुरावे म्हणून घटनास्थळावरून नमुने गोळा केले. पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी भूषण रासनेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक शरद काकळीज करत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !