मराठा बांधवांनी उधळला गुलाल : मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य


Maratha brothers threw a tantrum: All demands of Manoj Jarange accepted मुंबई (2 सप्टेंबर 2025) : मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी छेडलेल्या उपोषणाला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे रात्री उशिरापर्यंत उपोषण संपण्यात जमा होण्याची आशा आहे.

तर मुंबई खाली करणार
सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याचा जीआर तत्काळ काढला, तर रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई खाली करण्याचा शब्द मनोज जरांगे यांनी यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला आहे.






एका तासात काढा सर्व जीआर
मनोज जरांगे म्हणाले, तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो. मागण्या मान्य झाल्या की, सगळे मराठे आनंद व्यक्त करत मुंबईच्या बाहेर पडतील. एक तासात सर्व जीआर काढा आणि आमच्याकडे घेऊन या, त्यानंतर अंतिम निर्णय सांगू. सरकारने एकूण तीन जीआर काढावेत. सातारा, हैदराबाद गॅझेटियरचा वेगवेगळा जीआर आणि आमच्या इतर मागण्यांचा वेगळा जीआर काढावा. सर्वकाही सुरुळीत झाले तर रात्री 9 वाजेपर्यंत सर्व मराठे मुंबई मोकळी करतील.

मराठा-कुणबी एकच असल्याच्या मुद्यावर सरकारला मुदत
मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा व कुणबी एकच असल्याच्या मुद्यावर सरकारला दोन महिन्यांची मुदत देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, आम्ही सरकारकडे 58 लाख नोंदींच्या आधारावर मराठा व कुणबी एकच असल्याचा जीआर काढण्याची मागणी केली होती. त्यावर सरकारने हा मुद्दा क्लिष्ट असल्यामुळे त्यावर निर्णय घेण्यासाठी महिन्याभराची मुदत मागितली होती. मी त्यांना दीड महिन्यांची मुदत दिली पण विखे पाटलांचा हात थोडा जड आहे. त्यांनी दोन महिन्यांचा वेळ मागितला. त्यानुसार आम्ही त्यांना ही मुदत दिली. या मुदतीनंतर मराठा व कुणबी एकच असल्याचा जीआर काढला जाईल.

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडवायला यावे : जरांगे
आमचे सरकार सोबतचे वैर संपले त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार या तिघांनी येथे येऊन आमचे उपोषण सोडवावे, असे जरांगे म्हणाले. त्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगेंना प्रथम उपोषण सोडण्याची विनंती केली. हे तिघेही बाहेर असल्यामुळे ते येणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.

मराठा बांधवांनी उधळला गुलाल
सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी फटाकेही फोडले जात आहेत. आझाद मैदानासह मुंबईत विविध ठिकाणी हे चित्र आहे. दरम्यान, जीआरमध्ये शासकीय भाषा असते. त्यामुळे मनोज जरांगे यांचे वकील त्यांना सरकारच्या जीआरमधील प्रत्येक वाक्याचा अर्थ समजावून सांगत आहेत.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !