नाशिक हादरले : मैत्रिणीला छेडल्याच्या वादातून एकाला संपवले
Nashik shaken : One killed over an argument over teasing his girlfriend नाशिक (3 सप्टेंबर 2025) : मैत्रिणीला छेडल्याच्या वादातून तिघांनी एकाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून खून केल्याची घटना मंगळवारी भरदिवसा दुपारी 2.45 वाजता त्र्यंबकनाक्यावरील फूटपाथवरच घडली.
छेड काढल्याच्या वादातून घटना
मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून फिरस्त्या युवकाच्या डोक्यावरच पेव्हर ब्लॉक टाकण्यात आला. या घटनेने परिसरात नागरिक, व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





त्र्यंबक नाक्यावरील ठक्कर बसस्थानकाच्या मागील बाजूस माझदा हॉटेलच्या समोर फुटपाथवर दोन युवक एक मैत्रिणीसोबत फिरत असताना त्यांनी फिरस्ता असणार्या युवकाला रस्त्यातच मारहाण सुरू केली. फिरस्त्याला खाली पाडून त्याच्या डोक्यात जवळील पेव्हर ब्लॉक उचलून दोन-तीन वेळा मारून जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडेपर्यंत मारले.
पोलिसांची लागलीच धाव
हा प्रकार पोलिसांना समजताच युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, पथकातील कर्मचारी प्रशांतमरकड, विशाल काठे, संदीप भांड, मिलिंदसिंग परदेशीयांनी धाव घेत अर्ध्या तासाच्या आत माहिती काढून तीन युवक आणि युवती पळून जाताना पाठलाग करून त्यांना पकडलेे. चौकशीत संशयित जयेश रायबहादूर याने मैत्रिणीला छेडल्याच्या कारणातून खून केल्याची कबुल ीदिली. पथकाने संशयित सिद्धेश बांगर, रियान मन्सुरीसह एका युवतीला ताब्यात घेत सरकारवाडा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल केला.
