नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद ; मंत्री संजय सावकारे

भुसावळातील पंचशील नगरात शिबिराला प्रतिसाद : 150 वर रुग्णांची तपासणी


Health camp initiative for citizens commendable ; Minister Sanjay Savkare भुसावळ (4 सप्टेंबर 2025) : पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात बदल झाल्याने अनेक व्याधी तयार होतात व त्यामुळे विनोद सोनवणे यांनी योग्य वेळ साधून आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे काढले. शहरातील गोल्डन अवर हॉस्पीटल व समाजसेवक विनोद सोनवणे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 20 मधील पंचशील नगरवासीयांसाठी गुरुवारी आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व दिडशेवर रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद
मंत्री संजय सावकारे म्हणाले की, वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला, ताप येणे, घसा खराब होणे आदी आजारांचा त्रास उद्भवत आहे. त्याचवेळी सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून समाजसेवक विनोद सोनवणे यांनी या भागात आरोग्य शिबिराचे आयोजन केले ही बाब कौतुकास्पद असून अशा शिबिरांची खरोखर आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. भुसावळातील गोल्डन अवर रुग्णालयाचे डॉ.सांतनू कुमार साहू यांचे कौतुकास्पद असून त्यांच्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असल्याचे सांगून त्यांनी गोल्डन अवर रुग्णालयाचे कौतुक केले.






यांची व्यासपीठावर उपस्थिती
याप्रसंगी मंत्री संजय सावकारे, माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी, राज विजय चौधरी, समाजसेवक विनोद सोनवणे, अष्टभूजा डेअरीचे संचालक नितीन धांडे, नॅशनल व्हाईस मिडीया फोरमचे दिनेश इखारे, समाजसेवक बंटी नरवाडे आदींची उपस्थिती होती.

150 रुग्णांची तपासणी व औषधोपचार
मोफत आरोग्य शिबिरात गोल्डन अवर रुग्णालयाचे आरएमओ डॉ.आफताब खान, डॉ.तेहनीयत शेख, डॉ.ईरम शेख, नर्सिग स्टाफ अश्विनी तावरे व बरखा केशनिया आदींनी सुमारे 150 नागरिकांसह महिला व मुलांचा रक्तदाब तपासण्यात आला तसेच रक्ताची चाचणी करण्यात आली व ईसीजी काढून आरोग्याविषयी जागरूकता करीत आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन रुग्णालयाचे पीआरओ गणेश वाघ यांनी करून आभारही मानले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
शिबिर यशस्वीतेसाठी विशाल नरवाडे, रवी दाभाडे, दीपक सोनवणे, भारत गोफणे, मयुर नरवाडे, बाळा इंगळे, रत्नदीप साळुंके, करन उमाळे, रत्नपाल नरवाडे, बंटी सपकाळे, गजानन निंबाळकर, विक्की इंधाटे, सम्यक सोनवणे, अस्लम पिंजारी,शब्बीर शेख,विक्रम वानखेडे,अल्ताफ शेख ,संदिप मैराळे, आशिष उमाळे, समाधान इंगळे, राष्ट्रपाल खंडेराव, शुभम दाभाडे आदींनी परिश्रम घेतले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !