जि.प.निवडणुकीत चक्रानुक्रम करताना पूर्वीच्या आरक्षणाचा निकष विचारात घ्या : भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
BJP Taluka President Prashant Patil भुसावळ (4 सप्टेंबर 2025) : ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जागेचे आरक्षण पद्धत व चक्रानुक्रम पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. चक्रानुक्रमासाठी पाहिली निवडणूक आहे. हा नियम अनुसूचित जाती जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला यांचेवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे सदर नियम वगळावा. चक्रानुक्रम करताना पूर्वीच्या निवडणूकीतील आरक्षणाचा निकष विचारात घ्यावा, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
73 व्या घटना दुरुस्तीने पंचायतराज संदर्भात भारतीय राज्यघटनेत तरतूद करण्यात आली. भारतीय राज्यघटना अनिच्छेद 243 क नुसार असणारी आरक्षण चक्रानुक्रम पद्धतीने दिली जावीत अशी स्पष्ट तरतूद आहे. जळगाव जिल्ह्यातील तळवेल हा गट एससी आरक्षित करण्यात आला. नंतर 2007 साली याच गटाचे नाव बदलल्याने तेच गावे गटात ठेवून निंभोरा गट पुन्हा एससी साठी आरक्षित करण्यात आला. त्या नंतर परत एसटीसाठी आरक्षीत करण्यात आला.





आता नवीन आदेशानुसार पुन्हा तोच गट व गण पुन्हा एसटी, एससी राखीव करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उतरत्या क्रमाने नामप्र महिला, पुरुष तसेच खुल्या वर्गावर अन्याय होणार आहे. अशी स्थिती अनेक ठिकाणी आहे. यामुळे शासनाने 20 ऑगस्ट रोजी काढलेल्या आदेशात सन 1997, 2002, 2007, 2012, 2017 या निवडणूकीच्या आरक्षण विचारात घेवून चक्रानुक्रम ठरवावा, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केली आहे.
