यावलमधील हायमास्ट सुरू करा : नगरपालिकेत काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे निवेदन
Start high mast in Yaval : Congress Minority Department’s statement in the municipality यावल (4 सप्टेंबर 2025) : यावल नगरपालिकेत शहरातील काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने निवेदन देण्यात आले. शहरात ख्वाजा मजीद तसेच चोपडा रोडवरील दुभाजकावर बंद अवस्थेत असलेले हायमास्ट सुरू करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी करण्यात आली.
पालिकेत दिले निवेदन
नगरपालिकेमध्ये कक्ष अधीक्षक विशाल काळे यांच्याकडे काँग्रेस अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष अकीलोद्दीन शेख, मोहम्मद वसीम शेख, नदीम शेख अबरार शेख, नदीम शेख रफिक, हाफिज खान यांनी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, शुक्रवारी यावल शहरात ईद मिलादुन्नबी सण साजरा केला जात आहे. तेव्हा या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध भागात मुस्लिम समाज बांधवांनी रोषणाई केली आहे. असे असले तरी यावल शहरातील ख्वाजा मस्जिद तसेच चोपडा रोडावरील दुभाजकावर असलेले हायमास्ट हे बंद आहे. तेव्हा नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन हे हायमास्ट सुरू करावे अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.





