शहाद्यात पुन्हा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला


बाधीत रुग्ण मयताच्या आला संपर्कात : नंदुरबार जिल्ह्यातील बाधीतांची संख्या आठवर

शहादा : शहरातील कोरोनाबाधीत व्यावसायीकाचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मयताच्या संपर्कात आलेल्या तब्बल 29 नागरीकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. शुक्रवारी मयताच्या संपर्कात आलेल्या एका 23 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शहाद्यातील बाधीतांची संख्या आता तीनवर पोहोचली असून नंदुरबार जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा आठवर पोहोचला आहे.

रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासनाकडून शोध
शहाद्यातील 23 वर्षीय तरुणाचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर या युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासनाकडून शोध सुरू करण्यात आला आहे. बाधीत 23 वर्षीय युवक हा मृत पावलेल्या रुग्णाच्या परीसरातच वास्तव्याला असल्याचे सांगण्यात आले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !