गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ
34 वाहनांत बॉम्ब, 400 किलो आरडीएक्स व 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याचा धमकीने खळब्ळ
Bomb blast threat creates panic in Mumbai on the eve of Ganeshotsav मुंबई (5 सप्टेंबर 2025) मुंबई शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. व्हॉट्स अॅपवरून ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत नंबरवर पाठवलेल्या संदेशात शहरात भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दावा करण्यात आला. या संदेशामुळे सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ शहरात हाय अलर्ट जारी केला आहे.
34 वाहनांमध्ये बॉम्ब लावल्याचा उल्लेख
धमकीच्या संदेशात 34 वाहनांत बॉम्ब लावल्याचा उल्लेख आहे. यासोबतच, तब्बल 400 किलो आरडीएक्स आणण्यात आले असून त्याद्वारे एक कोटी लोकांना ठार मारण्याची क्षमता असल्याचा दावा करण्यात आला आहे तर 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचेही या संदेशात आहे.





एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले की, ज्या व्हॉट्सप नंबरवरून हा मेसेज पाठवण्यात आला होता. तो नंबर शोधण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिस नेहमीच सतर्क आहेत आणि आम्ही सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत. जनतेने घाबरू नये, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि सर्व काही शांत आहे. अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही.
संशयास्पद वस्तू आढळल्यास कळवण्याचे आवाहन
सायबर सेल आणि दहशतवादविरोधी पथकाने मिळालेल्या संदेशाचा सखोल तपास सुरू केला आहे. हा संदेश खरा आहे की खोटा, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक मदतीचा वापर करत आहेत. अशा प्रकारे मिळणार्या धमक्या अनेकदा खोट्या निघाल्या असल्या तरी, पोलिस अलर्ट मोडवर आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, तसेच कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळल्यास लगेच पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.
