कोरोना : अक्कलकुव्यात दोघे तर शहाद्यात पुन्हा एक बाधीत


नंदुरबार जिल्ह्यात उडाली खळबळ : जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या पोहोचली 11 वर

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. अक्कलकुवा येथे दोघांचा तर शहाद्यातील एकाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाभरातील कोरोना रुग्णांची संख्या 11 वर पोहोचल्याने जिल्हा आता रेड झोनकडे वाटचाल करीत असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील 66 जणांचे अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाल्यानंतर त्यात तिघांचे पॉझिटिव्ह तर 63 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, अक्कलकुवा येथील 23 व 48 वर्षीय वर्षीय महिलेचा पॉझिटीव्ह अहवाल आला असून शहाद्यातील 23 वर्षीय युवकाचाही पॉझिटीव्ह अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !