श्री विसर्जनादरम्यान जळगावात दोघे बुडाले
Two drown in Jalgaon during Sri Visarjan जळगाव (7 सप्टेंबी 2025) : श्री विसर्जनादरम्यान जळगावात वेगवेगळ्या घटनेत दोघे बुडाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने गणेश भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे.
ममुराबाद येथील 25 वर्षीय गणेश कोळी गणपती विसर्जनादरम्यान कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोर गिरणा नदीत वाहून गेला तर जळगावच्या
गिरणा पंपिंग भागातही अशीच दुसरी घटना घडली. राहुल सोनार (कोल्हे हिल्स, जळगाव) हा देखील गिरणा नदीत बुडाला असून दोन्हींचा शोध आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेण्यात येत आहे.





दोन्ही घटनांनी समाजमन सुन्न
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील कोळी कुटुंबीय घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी निमखेडी शिवारातील नवीन बायपासलगत असलेल्या गिरणा नदीकडे आले होते. विसर्जनासाठी गणेश गंगाधर कोळी (25) हा तरुरुण मूर्ती घेऊन नदीपात्रात उतरला. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे आणि गिरणा धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीचा प्रवाह अधिकच वेगवान होता. या जोरदार प्रवाहात गणेश कोळी वाहून बेपत्ता झाला.
कुटूंबियांच्या डोळ्यादेखत घटना
ही घटना आई-वडील व कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोर घडल्याने त्यांना जबर मानसिक धक्का बसला.
दुसर्या घटनेत गिरणा पंपिंग या भागातही राहुल सोनार (कोल्हे हिल्स, जळगाव) हा विसर्जनाला आल्यानंतर गिरणा नदीमध्ये वाढलेल्या पाण्यात वाहिला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथक व अन्य संबंधित विभागांना पाचारण केले. सध्या या तरुणाचा शोध नदीपात्रात सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने शनिवारी रात्री वाजेपर्यंत गणेश पुढे याचा गिरणा नदीपात्रात शोध घेतला परंतु धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने शोध कार्यात अडथळे आले. त्यामुळे आज सकाळी पुन्हा शोध कार्याला सुरुवात करण्यात आली.
