ओबीसींच्या कर्ज प्रकरणात पिळवणूक थांबवावी : शिशिर जावळे यांचा आंदोलनाचा इशारा


Extortion should stop in OBC loan cases: Shishir Javale warns of agitation भुसावळ (7 सप्टेंबर 2025) : ओबीसी समाजासाठी इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज योजनांची अंमलबजावणी केली जाते मात्र या कर्ज प्रकरणांत ओबीसी समाजातील अर्जदारांना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून पिळवणूक केली जात असल्याचां आरोप भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर डी.जावळे यांनी केला आहे.

ओबीसी बांधवांची पिळवणूक
कर्ज प्रकरणांसाठी लाभार्थ्यांकडून वारंवार दस्तऐवज मागवणे, फाईल्स थांबवून ठेवणे, तसेच मध्यस्थांमार्फत पैसे उकळण्याचे प्रकार असह्य आहेत. ओबीसी बांधवांची अशा प्रकारे पिळवणूक होणे हे लाजिरवाणे असून, तातडीने यावर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा ओबीसी मोर्चा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल, असेही जावळे यांनी प्रसिद्धी प्रत्रकात म्हटले आहे.






बँक अधिकार्‍यांची मनमानी रोखणार
ओबीसी समाजाचे आर्थिक सबलीकरण हेच आमचे ध्येय आहे. योजनांचा लाभ खर्‍या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी पारदर्शकता आवश्यक आहे. शासनाने तातडीने उपाययोजना केली पाहिजे. या पार्श्वभूमीवर ओबीसी मोर्चाचे ओबीसी समाजाच्या युवक-युवतींना व उद्योजकांना कर्ज मिळण्यात अधिकारी व बँकांचा अकार्यक्षम व प्रतिकूल दृष्टिकोन दिसून येतो. दस्तऐवजांची वारंवार मागणी, फाईल्स थांबवणे, अनावश्यक दिरंगाई आणि मध्यस्थांमार्फत लाचलुचपत करणे हे प्रकार सहन केले जाणार नाहीत. जर तातडीने पिळवणूक थांबवून ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही, तर ओबीसी मोर्चा रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन उभारेल, असा इशारा त्यांनी दिला.

ही तर सरकारची जवाबदारी
जावळे यांनी पुढे स्पष्ट केले की, ओबीसी समाजाचे आर्थिक सबलीकरण ही सरकारची जबाबदारी आहे. कर्ज योजनांचा खरा लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी पारदर्शकता व तत्परता हवी. अन्यथा ओबीसी बांधवांसह आम्ही कठोर पावले उचलू. असंही त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविलेले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !