मनुदेवी पाझर तलावात गणेश भक्ताचा बुडून मृत्यू

Ganesh devotee drowns in Manudevi Pazar Lake यावल (7 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील श्रीक्षेत्र मनुदेवी परीसरात असलेल्या पाझर तलावात गणपती विसर्जनादरम्यान तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना 6 रोजी घडली असतीतरी बेपत्ता तरुणाचा मृतदेह रविवार, 7 रोजी सकाळी 11 वाजता आढळला. रोहिदास शिवराम लहानगे (42, खालकोट, ता.यावल) असे मृताचे नाव आहे.
काय घडले तरुणासोबत ?
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खालकोट या आदिवासी वस्तीवरील काही तरूण गणपती विसर्जनानिमित्त गणेश चतुर्थीच्या दिवशी मनुदेवी मंदिर परिसरात असलेल्या पाझर तलावावर आले होते. यावेळी गणपती विसर्जन करत असताना या तरुणांपैकी रोहिदास शिवराम लहानगे (42) हा तरुण पाय घसरून तलावात बेपत्ता झाला व संध्याकाळी अंधार पडल्याने त्याला शोधता आले नव्हते.