हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा; ओबीसीत घुसखोरी नको
भुसावळला अ.भा.महात्मा फुले समता परिषदसह ओबीसी समाजातर्फे प्रांतांना दिले
Cancel the government decision of Hyderabad Gazette; No infiltration of OBCs भुसावळ (9 सप्टेंबर 2025) : राज्य शासनाने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार मराठा कुणबी/कुणबी मराठा हे एकच असल्याचे 2 सप्टेंबरला शासनाने काढलेल्या जी. आर. अध्यादेशात हा उल्लेख नमूद करण्यात आला असून तो निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. तो अध्यादेश जी. आर. त्वरीत रद्द करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाजातर्फे मंगळवार, 9 रोजी दुपारी अकरा वाजता प्रांताधिकारी विजेंद्र पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी ओबीसी आरक्षण संदर्भात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
ओबीसी आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी
प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे मराठा कुणबी कोणी मराठा एकच आहे, असा शासन निर्णय अध्यादेश जीआर काढला त्या जीआरमुळे सकल ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. ओबीसी प्रवर्गात घुसखोरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न या अध्यादेशाने झाला आहे. ओबीसी समाज या जीआरचा निषेध करीत आहे आणि हा अध्यादेश जीआर त्वरित रद्द करण्यात यावा. तसेच 53 लाख बोगस कुणबी नोंदणी त्वरित रद्द करण्यात याव्यात आणि न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करावी. या समितीचे काम पक्षपाती असल्याने ही समिती सरकारने बरखास्त करावी, असेही निवेदनात नमूद आहे.





ओबीसी समाजात मराठा समाजाची घुसखोरी आणि त्यांना आमच्या ताटातील आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र वेगळ्या प्रवर्गात आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे. तसे न झाल्यास संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याच्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असेही निवेदनात नमूद आहे. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, ओबीसी एक जुटीचा विजय असो, भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा विविध प्रकारच्या घोषणांनी प्रांत कार्यालय परिसर दणाणून गेला.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे रावेर विभाग कार्याध्यक्ष संतोष माळी, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, मुरलीधर (गोलू) पाटील, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, समता परिषदच्या भुसावळ तालुका संघटिका सविता माळी, सोनिया गायकवाड, अतुल झांबरे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे, दिलीप चौधरी, अनिल महाजन, राजेंद्र माळी, धोबी समाजाचे जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे, माजी नगरसेवक परीक्षेत बर्हाटे, चुडामन भोळे, भोरगाव लेवा सामीतीचे सदस्य दिनेश भंगाळे, जिजाबाई माळी, लक्ष्मी बैरागी, मनीषा पाटील, सरुबाई वाघमारे, प्रकाश घुमरकर, महेंद्र गोसावी, समता परिषद वरणगाव शहराध्यक्ष गणेश माळी, उदय पाटील, वैभव लोणारी, घनश्याम महाजन, यशवंत पाटील, तोरण महाजन, रोशन राणे, सुमेध नारखेडे, प्रमोद भोळे उपस्थित होते.
