भुसावळातील भुलाबाई महोत्सवात द वर्ल्डच्या संघाला द्वितीय पारितोषिक
The World team wins second prize at the Bhulabai Festival in Bhusawal भुसावळ (9 सप्टेंबर 2025) : भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळ व केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित भुलाबाई महोत्सव शहरातील संतोषी माता सभागृहात झाला. भुसावळ तालुक्यातील 19 संघ त्यात सहभागी झाले. या महोत्सवात कोलते फॉउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमधील 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनींनी द्वितीय क्रमांकाचे त 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनींनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले
जिल्हास्तरावर निवड
मोठ्या गटाची निवड जिल्हा स्तरावर करण्यात आली. पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यखा रजनी सावकारे आणि वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.





