यावलच्या ‘त्या’ बालकावर लैंगिक अत्याचार ; शवविच्छेदन अहवालातून बाब उघड
आरोपीविरोधात पोक्सो कलमान्वये केली वाढ
Sexual assault on ‘that’ child from Yaval; Autopsy report reveals the matter यावल (10 सप्टेंबर 2025) : शहरातील एका भागातील भागातील रहिवासी असलेल्या पाच वर्षीय अल्पवयीन बालकाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला. हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर याच भागातील एका तरुणाला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. मृताचे शवविच्छेदन केल्यानंतर अहवालाता या बालकाची हत्या करण्यापूर्वी त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्याने आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराच्या कलमाची वाढ करण्यात आली.
काय घडली यावल शहरात ?
शहरातील एका भागातील पाच वर्षीय बालक हा शुक्रवारी बेपत्ता झाल्यानंतर शनिवारी त्याचा मृतदेह घराशेजारील शेख शाहिद शेख बिस्मिल्ला न्हावी (22) या तरुणाच्या घरात आढळला. आरोपीने बालकाची गळा आवळून हत्या केली व नंतर मृतदेह जाळून पोत्यात लपवला होता. या तरुणाच्या वडिलांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन करीत या गुन्ह्याची माहिती दिली होती.





आरोपीविरोधात कलम वाढवले
बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाला असून या बालकावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. खुनाच्या या गुन्ह्याच्या कलमात बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण कायदा पोक्सो अन्वये कलमाची वाढ करण्यात आली.
अटकेतील आरोपीला 15 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास तपास डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहे.
