बेवारस इलेक्ट्रीक वायरचा धक्का ठरला शेतकर्‍यासाठी काळ : रुईखेडा गावात शोककळा


Farmer in Ruikheda dies after being electrocuted मुक्ताईनगर (10 सप्टेंबर 2025) : शेतात काम करत असताना जमिनीवर पडलेल्या बेवारस इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून 41 वर्षीय शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकनाथ जगन्नाथ कांदले (41) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. या घटनेमुळे रुईखेडा गावात शोककळा पसरली. मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शेतात काम करताना दुर्घटना
रुईखेडा येथील रहिवासी असलेले एकनाथ कांदले हे बटाईने केलेल्या शेतात काम करत होते. त्यावेळी जमिनीवर पडलेल्या बेवारस इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.






या घटनेची माहिती मयत एकनाथ कांदले यांच्या भावाने पोलिसांना दिली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय रमेश पवार करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !