दहिगावातील तरुणाचे खून प्रकरण : आरोपी कोठडीत
Murder case of a young man in Dahigaon : Accused in custody यावल (10 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील दहिगाव येथील 21 वर्षीय तरुणाच्या हत्ये प्रकरणी अटकेत असलेल्या दहिगाव येथील दोघांची व यावल येथील एकाची पोलिस कोठडी सोमवारी संपल्यानंतर संशयीताला न्यायालयाने 14 दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावली व आरोपींची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. या गुन्ह्यात नागपुर जिल्ह्यातील तसेच दहिगाव गावातील अशा दोन अल्पवयीन मुलीचा देखील पोलिसांकडून महत्वपुर्ण जबाब नोंदवण्यात आला.
असे आहे खून प्रकरण
दहिगाव, ता.यावल या गावातील सुरेश आबा नगरातील रहिवासी इम्रान युनूस पटेल (21, मूळ रहिवासी हनुमंतखेडा, ता.धरणगाव) या तरुणाची शुक्रवार, 29 ऑगस्ट रोजी रात्री ज्ञानेश्वर गजानन पाटील (19) व गजानन रवींद्र कोळी (19, दोन्ही रा.सुरेश आबा नगर, दहिगाव) या तरुणांनी कोयत्याने वार करीत हत्या केली.





खुनानंतर दोघे आरोपी पोेलिसांंना शरण आले होते तसेच या गुन्ह्यात त्यांच्या सोबत यावल शहरातील सुतार वाडा भागातील रहिवासी तुषार राजेश लोखंडे उर्फ जन्नत (19) हा देखील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यालादेखील अटक करण्यात आली. अटकेतील तिघांना यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्या.आर.एस.जगताप यांनी 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस कोठडी संपल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आरोपींची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहे.
