वराडसीमला महिलेचा विनयभंग करीत मारहाण : तिघांविरोधात गुन्हा
Woman molested and beaten in Varadsim: Case filed against three भुसावळ (10 सप्टेंबर 2025) : बसस्थानकावर उभ्या असलेल्या महिलेला शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली तसेच तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे 1 व 3 सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी तिघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले महिलेसोबत ?
35 वर्षीय महिला एका गावातील रहिवासी असून ती 1 ते 3 रोजी वराडसीम गावातील बसस्थानकासह वराडसीम हायस्कूलजवळ उभी असताना संशयीतांनी तिला तू दारू विक्री करते, असे म्हणत तू तक्रारी केल्यास तर तुला पोलिसांना सांगून हद्दपार करेल, अशी धमकी दिली व मारहाण, शिगिवाळ करीत विनयभंग केला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पिंटू देविदास ठाकूर, प्रकाश देविदास ठाकूर व काशीनाथ जुलालसिंग पाटील (सर्व रा.वराडसीम, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास बाविस्कर करीत आहेत.





