भुसावळ रेल्वे स्थानकावर अनोळखी तरुणाचा मृत्यू : ओळख पटवण्याचे आवाहन


Death of an unidentified youth at Bhusawal railway station : Appeal to identify भुसावळ (10 सप्टेंबर 2025) : भुसावळ रेल्वे स्थानकावर 35 ते 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून मृताची ओळख पटवण्याचे आवाहन रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

बेशुद्धावस्थेत आढळला तरुण
रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशनवर 5 सप्टेंबर रोजी 7.54 वाजेच्या सुमारास अनोळखी 35 ते 40 वर्षीय तरुण बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती यंत्रणेला कळताच तरुणाला सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.






असे आहे मयताचे वर्णन
अनोळखी तरुणाचे 35 ते 40 वर्ष असून मयताच्या अंगात आकाशी रंगाचा निळ्या बारीक लाईनिंगचा शर्ट, निळी काळी पँट, केस काळे वाढलेले, दाढी बारीक वाढलेली, शरीर बांधा सडपातळ, रंग गोरा आहे. तरुणाची ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपासाधिकारी तथा एएसआय संजय जंजाळकर (98231-02334) यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !