शनीपेठसह एमआयडीसी हद्दीतून बकर्या चोरणार्या चोरट्यांना गुन्हे शाखेकडून बेड्या

Performance of Jalgaon Crime Branch : Goat thieves arrested जळगाव (11 सप्टेंबर 2025) : पशूधनाची चोरी झाल्याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल होताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने चिंचोली, ता.जळगाव येथील त्रिकूटाला बेड्या ठोकल्या. आरोपींकडून चोरी केलेल्या बकर्या तसेच गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.
काय घडले जळगावात ?
सैय्यद परवेज सैय्यद आसीफ यांनी मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 27 ऑगस्ट रोजी त्यांचा सात हजार रुपये किंमतीचा बोकड आणि आवेश शेख यांची सहा हजारांची बकरी चोरीला गेली. शनिपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तर जळगाव गुन्हे शाखेकडूनही तपास सुरू करण्यात आला.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व पथकाने चिंचोली, ता.जळगाव गावातील संशयीत गणेश वासुदेव जाधव (20), गणेश अशोक पाटील (21) व अक्षय विजय वंजारी (23) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी बकरी आणि बोकड चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींनी एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतूनही तीन बकर्या चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींनी चोरीचा बोकड आणि बकरी राहुल रतन राऊळकर नावाच्या खाटिक व्यक्तीला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी खाटीककडून बकरी जप्त केली असून, बोकडाची रोख रक्कम हस्तगत केली. आरोपींना अधिक तपासासाठी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, एएसआय अतुल वंजारी, हवालदार प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रतन हरी गीते, सिद्धेश्वर डापकर, प्रदीप चवरे, रवींद्र कापडणे आदींच्या पथकाने केली.
