तोंडापूरच्या बालकाचा तलावात बुडून मृत्यू

A child from Tondapur drowned in a lake and died. जामनेर (11 सप्टेंबर 2025) : जंगलात भावासोबत शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या चुलत भावांपैकी आठ वर्षीय बालकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 10 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. शेख रेहान वाहेद (15) असे मृत बालकाचे नाव आहे.
काय घडले बालकासोबत ?
शेळ्या चारत असताना जवळील एका तलावात पाणी पिण्यासाठी दोघेही गेले असता कााठावरून एकाचा पाय घसरला. पाणी खोलवर असल्याने व दोघांनाही पोहोता येत नसल्याने रेहानचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.