सलून व्यावसायीकाने मृत्यूला कवटाळले : पाळधीत हळहळ

Salon owner commits suicide : Panic in the community धरणगाव (11 सप्टेंबर 2025) : पाळधी, ता.धरणगाव गावातील सलून व्यावसायीकाने नैराश्यातून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. तरुाने पंख्याला टॉवेल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विजय रमेश तायडे (32) असे मृताचे नाव आहे.
नैराश्यातून तरुणाची आत्महत्या
मृत विजय बसस्थानक परिसरात भावासोबत सलून व्यवसाय करीत होता. त्याचे एलएलबीपर्यंत शिक्षण देखील पूर्ण झाले होते. विजय हा पत्नी, मुलासह वेगळा राहत होता.

सध्या पत्नी लहान मुलासह माहेरी गेल्याने विजय एकटाच घरी होता. त्याने आईला फोन करून फाशी घेत असल्याचं सांगितलं. त्यांनी तत्काळ खाली राहणार्या लहान भावास कल्पना दिली.
आई-वडील, मोठा भाऊ तो वास्तव्यास असलेल्या श्याम कॉलनीतील वरच्या खोलीत गेले असता आतून कडी लावली असल्याने दरवाजा तोडावा लागला. सर्वजण आतमध्ये गेल्यानंतर विजय गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत विजयच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
