पत्नीसह कुटूंबाशी वादानंतर पतीची सासरवाडीत आत्महत्या : चौघांविरोधात गुन्हा


Husband commits suicide in in-laws’ home after argument with wife and family: Case filed against four जामनेर (11 सप्टेंबर 2025) : पत्नीसह सासरच्या मंडळींसोबतच्या वादानंतर वैफलग्रस्त तरुणाने सासरवाडीत आत्महत्या केली. सिंदखेड लपाली येथे ही घटना सोमवार, 8 रोजी घडली. याबाबत धामणगाव बढे पोलिसात पत्नीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. बादल हवसू मंडाळे असे मृताचे नाव आहे.

असे आहे प्रकरण
मयत बादल मंडाळे यांची पत्नी मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गावची रहिवासी असून त्या गर्भवती असल्याने माहेरी आल्या आहेत. महिलेने त्यांच्या पोटातील गर्भ पाडल्याची माहिती मिळताच पत्नीला घेण्यासाठी बादल सासुरवाडीला निघाला मात्र तेथे पोहोचल्यावर पत्नी आणि सासरच्या मंडळींसोबत बादल मंडाळे यांचा वाद झाला. याच वादामुळे बादल मंडाळे याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली, अशा आशयाची फिर्याद इंदुबाई चिंधू मुके (रा. कुंभारी) यांनी धामणगाव बढे पोलिसात दिली. त्यावरून रुपाली बादल मंडाळे, संजय जयराम भंवर, लिलाबाई संजय भंवर, अक्षय संजय भंवर (सर्व रा. लपाली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर करत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !