भरधाव दुचाकीने उडवल्याने वरणगावातील 19 वर्षीय युवक ठार


19-year-old youth from Varangaon killed after being hit by speeding bike वरणगाव (12 सप्टेंबर 2025) : शुक्रवारची नमाज (प्रार्थना) अदा करण्यासाठी निघालेल्या वरणगावातील युवकाला भरधाव दुचाकीने उडवल्याने युवकाचा मृत्यू ओढवला. ही धक्कादायक घटना दीपनगराजवळील जुन्या महामार्गावर शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. हुजेब राऊत खाटीक (19, रा. वरणगाव) असे मृताचे नाव आहे. मयत तरुण सहा बहिणींचा एकुलता एक भाऊ असल्याने मन हेलावणारा आक्रोश केला.

भरधाव दुचाकीने उडवले
सूत्रांच्या माहितीनुसार, हुजेब हा शुक्रवार असल्याने नमाज पठण करण्यासाठी पायी जात असताना दीपनगर 210 च्या गेटजवळ भरधाव दुचाकी (एम.एच.19 आर.9526) क्रमांकाच्या दुचाकीने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, हुजेबचा जागीच मृत्यू झाला.


आरोपीला ताब्यात घेण्यासाठी जमाव संतप्त
अपघातानंतर भुसावळ तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून हुजेबचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय ट्रामा सेंटरमध्ये हलवला. या संतप्त नातेवाईकांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करीत संताप व्यक्त केला. पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ, शहर निरीक्षक उद्धव डमाळे व सहकार्‍यांनी धाव घेत जमावाला शांत केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !