भुसावळ शहर पुन्हा खुनाने हादरले : कौटूंबिक वादातून माम सासर्‍याची हत्या ; सासर्‍यासह जावई जखमी


Bhusawal city shaken by murder again : Mother-in-law murdered over family dispute; Father-in-law and son-in-law injured भुसावळ (12 सप्टेंबर 2025) : कौटूंबिक वादातून नात्याने माम सासरा असलेल्या 40 वर्षीय प्रौढाची चाकूचे वार करीत हत्या करण्यात आली तर वादादरम्यान झालेल्या तुंबळ हाणामारीत व चाकूहल्ल्यात संशयीत जावयासह सासरादेखील जखमी झाला. ही धक्कादायक घटना खडका रोडवरील अयान कॉलनीत शुक्रवार, 12 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. खुनाच्या घटनेने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शेख समद शेख ईस्माईल (40, कंडारी) असे मयताचे नाव आहे.

काय घडले भुसावळ शहरात ?
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून दोन परिवारात वाद निस्तरण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सासरा व जावई व नातेवाईक खडका रोडवरील अयान कॉलनीतील जावयाच्या घरात जमले मात्र शाब्दीक वाद गुद्द्यांवर पोहोचला व याचवेळी चाकू तसेच फरशीचा वापर झाल्याने शेख समद शेख ईस्माईल (40, कंडारी) यांच्या छातीवर चाकूचा घाव वर्मी बसला तसेच जावई शेख सुभान शेख भिकन (अयान कॉलनी, भुसावळ) व सासरा शेख जमील शेख शकील (धुळे) यांनादेखील मारहाण झाल्याने तसेच चाकू लागल्याने ते जखमी झाले. दोघांवर गोदावरी तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.


पोलिस यंत्रणेची धाव
भुसावळ पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारार्थ हलवले. यावेळी शेख समद शेख ईस्माईल (40, कंडारी) यांना बेशुद्धावस्थेत गोदावरीत हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे सांगितल्याने जळगाव सिव्हील रुग्णालयात मृतदेह हलवला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !