भुसावळातील ताप्ती पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात

Hindi Day celebrated with enthusiasm at Tapti Public English Medium School in Bhusawal भुसावळ (13 सप्टेंबर 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हिंदी विभागातर्फे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्रिंसीपल नीना कटलर यांनी हिंदी राजभाषा दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगीतले.
यांची होती उपस्थिती
उपप्राचार्य मनप्रीत कौर, श्रद्धाली घुले, हिंदी विभागाच्या शिक्षिका प्रतिभा काकडे, जयश्री मोरेस्कर, गायत्री घीर्णीकर, माया सोनवणे, शीतल बुला, किरण तुरकुले, आरती पाचपांडे, संगीत विभागाच्या शिक्षिका प्रीती देशपांडे, महेंद्र सूर्यवंशी, कला शिक्षक मुकेश कोळी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती वंदना, काव्य वाचन, भाषण आणि नाटीका विद्यार्थिनींनी सादर केली.