संतापात घर सोडलेली अल्पवयीन मुलगी आरपीएफच्या सतर्कतेने बाल कल्याण समितीच्या स्वाधीन
Minor girl who left home in anger handed over to Child Welfare Committee on the alert of RPF भुसावळ (15 सप्टेंबर 2025) : मध्य रेल्वेने सुरू केलेल्या ऑपरेशन नन्हें फरिश्ते अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर एक अल्पवयीन मुलगी संतापात घरून मुंबईकडे जात असतांना आरपीएफच्या तत्परतेमुळे ही मुलगी सुरक्षितपणे बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आली. बिहारमधील बेगुसराय येथील ही मुलगी आहे.
काय घडले नेमके ?
शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी भुसावळ स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तीनवर ही मुलगी आढळून आली. आरपीएफ यांना मिळालेल्या रेल मदत सूचनेनुसार आरपीएफ आशीष यादव आणि शिवकेश यादव यांनी शोध घेऊन मुलीला ताब्यात घेतले. प्रकरणाची माहिती आधार बहूद्देशीय संस्थेला देण्यात आली. संस्थेचे प्रकल्प समन्वयक सुनील हिवाळे व दीपाली हिवाळे हे आरपीएफ ठाण्यात दाखल झाले. एएसआय पी. के. दीक्षित यांच्या उपस्थितीत चौकशीदरम्यान मुलीने आपले नाव संजनाकुमार (बदलेले नाव) (वय 17, रा. चमथा, जि. बेगूसराय, बिहार) असे सांगितले. ती घरच्यांना काहीही न सांगता रागाच्या भरात घरून निघून गेल्याचे स्पष्ट केले.





