जेथे दहशत तेथूनच काढली पोलिसांनी गुन्हेगाराची धिंड : जळगावातील घटना
Terrorist innkeepers’ gang in Jalgaon जळगाव (15 सप्टेंबर2025) : घातपाताच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव शहर पोलिसांनी हाणून पाडत त्यांच्याकडून लोड असलेले दोन गावठी पिस्तुल आणि दहा जिवंत काडतूस जप्त केले होते. ही टोळी शहरातील गेंदालाल मिल परिसरात दहशत माजवित असल्याने शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्या टोळीची परिसरातून धिंड काढली.
भाईगिरी करणार्यांमध्ये भीतीचे वातावरण
ज्या परिसरात हे सराईत गुन्हेगार दहशत माजवित होते, त्याच परिसरात पोलिसांनी त्यांची धिंड काढल्यामुळे पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईमुळे शहरात भाईगिरी करणार्यांना धडकी भरली असून त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.





ज्या भागात दहशत तेथूनच काढली धिंड
घातपाचा डाव उधळून लावणार्या टोळीतील मुख्य संशयित युनूस उर्फ सद्दाम सलीम पटेल (33, रा.गेंदालाल मिल), सौहील शेख उर्फ दया सीआयडी सद्दाम सलीम पटेल (29, रा. शाहूनगर), निजामोद्दीन शेख हुसेनोद्दीन शेख (31, रा. आझादनगर) व शोएब अब्दुल सईद शेख (वय 29, रा. गेंदालाल मिल) या चौघांना गेंदालाल मिल परिसरात नेत त्याच भागातून त्यांची धिंड काढण्यात आली. जळगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
