भुसावळातील सायन्स क्वीझ स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कुलसह एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल प्रथम


N.K. Narkhede English Medium School along with Podar International School won first place in the Science Quiz Competition in Bhusawal भुसावळ (16 सप्टेंबर 2025) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मंगळवार, 16 रोजी शहर पातळीवर सुप्रसिध्द मराठी साहित्यिक स्व.बाबासाहेब के. नारखेडे यांच्या 45 व्या पुण्यतिथी निमित्त सायन्स क्वीझ स्पर्धा झाली. या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कुलसह एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलने प्रथम क्रमांक पटकावला.

यांची होती उपस्थिती
संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑनररी जॉईट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे यांनी माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली. सायन्स क्वीझ स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नाहाटा कॉलेजच्या प्रोफेसर भाग्यश्री भंगाळे तसेच डायरेक्टर मॅथ अ‍ॅकडमीचे प्रोफेसर जितेद्र पाटील उपस्थित होते.






36 विद्यार्थ्यांचा सहभाग
सायन्स क्वीझ या स्पर्धेसाठी शहरातील ताप्ती स्कूल, द वर्ल्ड स्कूल, आदर्श हायस्कूल, के.नारखेडे विद्यालय, प.क.कोटेचा हायस्कूल, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, महाराणा प्रताप विद्यालय, एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूल, पोदार स्कूल. भुसावळ, या सर्व शाळेतील एकूण 36 विद्यार्थ्यांनी सायन्स क्वीझ या स्पर्धेसाठी सहभाग घेतला.

शाळेतील गजाला बासीत, रुही बासीत, धनश्री पाटील, प्रियंका नेहेते, रत्नमाला सोनवणे, जयश्री नेहेते, रश्मी निकुंभ, रेश्मा जावळे, देवयानी राणे, शबनम तडवी, निलिमा चौधरी, रुपाली झोपे या स्पर्धेसाठी वरील सहशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

असा आहे स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक पोदार इंटरनॅशनल स्कुल आणि एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल यांना विभागून देण्यात आला. व्दितीय क्रमांक द वर्ल्ड स्कुल, भुसावळ तसेच तृतीय क्रमांक के.नारखेडे विद्यालय, भुसावळला मिळाला. सूत्रसंचलन गजाला बासीत यांनी केले. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे यांनी शुभेच्छा दिल्या.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !