भुसावळातील सेंट अलॉयसीस स्कूलवर कारवाईसाठी हिंदूत्ववादी संघटनांचा मोर्चा
Hindutva organizations march for action against St. Aloysius School in Bhusawal भुसावळ (16 सप्टेंबर 2025) : शहरातील सेंट लायसेंस हायस्कूलने सहलीच्या निमित्ताने मुस्लिम धर्मियांच्या मशिदीमध्ये विद्यार्थिनींना स्कार्प बांधून नेल्याच्या निषेधार्थ व दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर हजारो नागरिकांच्या सहभागाने मोर्चा काढण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण ?
सेंट अलॉयसीस शाळेतील स्काऊड गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी 11 सप्टेंबरला धार्मिक सलोखा सहल काढण्यात आली. या सहलीत मुस्लिम धर्मियांमध्ये महिलांना मशिदीत प्रवेश निषिध्द असताना मुलींना हिजाबप्रमाणे स्कार्प बांधून प्रवेश देण्यात आला. या प्रकाराच्या विरोधात भाजप व हिंदूत्ववादी संघटनांनी मंगळवार, 16 रोजी मोर्चा काढला.





सण साजरे करताना भेदभाव
वास्तविक या इंग्रजी शाळेत 95 टक्के हिंदू मुले आहेत मात्र येथे सण साजरे करताना धार्मिक भेदभाव केला जातो. शाळेकडून शासन नियमांना तिलांजली दिली जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला असून घडल्या प्रकाराबद्दल दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.
शाळा प्रशासनाकडून दिलगिरी
दरम्यान, घडल्या प्रकारानंतर सोमवारी शाळेच्या व्यवस्थापक ऍगनेस, मुख्याध्यापिका सिस्टर शिला यांनी या प्रकरणी कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता, याबाबत कोणत्या धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करुन क्षमा मागतो, असे त्यांनी सांगितले.
त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी
सेंट अॅलायसेंस शाळेतील सहलीच्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश माध्यमिक जिल्हाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिले आहेत. यानुसार सोमवारी उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विजय सरोदे, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, स्काऊड गाईड कार्यालय जळगावच्या जिल्हा समन्वयक वैशाली अटवाडे यांच्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी केली. यातून शाळेकडून विविध खुलासे मागविण्यात आले आहे. दोन दिवसानंतर त्रि सदस्यीय समिती चौकशी अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकार्यांकडे देणार आहे.
