रेल्वेच्या भुसावळ विभागात स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ


Swachhata Hi Seva campaign launched in Bhusawal division of Railways भुसावळ (20 सप्टेंबर 2025)  : रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार भुसावळ रेल्वे विभागात ‘स्वच्छता ही सेवा 2025 अभियानाची सुरुवात झाली आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान हे अभियान राबवले जाणार आहे. यावर्षीची थीम स्वच्छोत्सव अशी ठेवण्यात आली आहे.

रेल्वे अधिकार्‍यांना स्वच्छतेची शपथ
अभियानाच्या पहिल्या दिवशी विभागातील सर्व कार्यालये, स्थानके, कोचिंग डेपो, रेल्वे रुग्णालय, रेल्वे शाळा तसेच क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थान येथे स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. भुसावळात डीआरएम पुनीत अग्रवाल यांनी वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना डीआरएम कार्यालयात शपथ दिली.






प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी बॅनर, पोस्टर, उद्घोषणा प्रणाली आणि सोशल मीडियाचा वापर करून विविध संदेश दिले जात आहेत. या पंधरवड्यात दररोज स्वच्छता जनजागृती आणि श्रमदान कार्यक्रम होणार असून स्टेशन परिसर,प्लॅटफॉर्म,गाड्या,लोहमार्ग,कार्यालये,शौचालये व जलस्रोत यांची सखोल स्वच्छता केली जाईल. या उपक्रमाअंतर्गत रेल्वे कर्मचार्‍यांनी प्रत्येक आठवड्यात किमान दोन तास स्वयंस्फूर्त श्रमदान करण्याचा संकल्प केला आहे.स्वच्छता ही सेवा हा उपक्रम केवळ स्वच्छ भारत मिशनला चालना देणारा नसून पर्यावरण संवर्धन आणि प्रवाशांच्या सोयीसाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !