भुसावळात पिंटू ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळातील गोल्डन अवर रुग्णालयाचा उपक्रम ः शंभरावर रुग्णांनी केली तपासणी


Huge response to health camp organized in Bhusawal on the occasion of Pintu Thakur’s birthday भुसावळ (20 सप्टेंबर 2025) : शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील दिनदयाल नगरातील शाळा क्रमांक 35 मध्ये शुक्रवार, 19 रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडानिमित्त व माजी नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे आरोग्य शिबिर गोल्डन अवर रुग्णालयाच्या माध्यमातून झाले. या शिबिरात शंभरावर रुग्णांनी उपस्थित राहून मोफत शिबिराचा लाभ घेतला.

मोफत आरोग्य तपासणीसह औषधोपचार
मोफत आरोग्य शिबिरात रक्तदाब (बी.पी.), डायबीटीस (शुगर), कार्डीओग्राम (ईसीजी) अगदी मोफत काढण्यात आला. या शिबिरासाठी गोल्डन अवर रुग्णालयाचे आरएमओ डॉ.आफताफ खान, नर्सिंग ऑफिसर गुनगुन कौशल व खुशी कासडे तसेच पीआरओ गणेश वाघ उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक पिंटू ठाकूर, रुपेश देशमुख व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !